Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी ह्यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 8:10
13 Iomraidhean Croise  

मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.


रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे.


मग राजा व त्याचे सरदार ह्यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहूदा प्रांतात फिरले; ते लोकांना सांगत गेले की, “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून तुमचे जे लोक उरले आहेत त्यांच्याकडे तो वळेल.


तुम्हांला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहूद्यांविषयी लिहा, आणि पत्रावर राजाची मोहर करा; राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यांवर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही.”


माझे दिवस जासुदाहून त्वरित जात आहेत; ते पळत आहेत, त्यांत काही कल्याण दिसत नाही.


राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल?


उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील.


परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.


‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.


तुझ्या द्वारे मी घोडा व स्वार ह्यांचे तुकडे तुकडे करीन;


नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना : तुमचे कल्याण असो!


तर महाराज, ही द्वाही मंजूर करा. फर्मानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी ह्यांच्या कधी न पालटणार्‍या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan