Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, “पाहा, हामानाच्या येथे पन्नास हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे; ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे.” राजाने म्हटले, “त्याच खांबावर ह्याला फाशी द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर हरबोना नावाचा राजाच्या सेवकातील एक अधिकारी, म्हणाला “ज्या मर्दखयाने राजाचे रक्षण करण्यासाठी खबर दिली होती त्याच्यासाठी हामानाच्या घराजवळ पन्नास हात उंचीचा खांब उभारला आहे.” राजा म्हणाला “त्याच खांबावर त्यास फाशी द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 7:9
20 Iomraidhean Croise  

येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले.


सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,


तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला.


ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले.


त्यात हा मजकूर होता : अहश्वेरोश राजाच्या द्वारपाळांपैकी दोन खोजे बिग्थान व तेरेश ह्यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली.


मग अहश्वरोश राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहूद्यास म्हणाला, “हामानाने यहूद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले.


त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली. शूशन येथून फर्मान निघाले व लोकांनी हामानाच्या दहा पुत्रांना फासावर लटकवले.


पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.


दुर्जन आपल्याच जाळ्यात पडोत; मी तर त्यातून साफ निसटून जाईन.


त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.


एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’


दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan