Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग जेथे द्राक्षरस दिला गेला होता त्या दालनामध्ये, राजा बागेतून येऊन उभा राहिला मेजवानीच्या, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एस्तेर राणी ज्या आसनावर रेलून बसली होती, त्या आसनावर हामान वाकलेला होता आणि नेमक्या त्याच क्षणी राजवाड्याच्या बागेत गेलेला राजा परतला. तेव्हा संतापाने राजा ओरडला, “अरे, ती माझ्यासह इथे घरात असताना देखील हा राणीवर बलात्कार करू पाहतो काय?” राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताक्षणी राजसेवकांनी हामानाचा चेहरा झाकून टाकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 7:8
9 Iomraidhean Croise  

एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहानथोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात सात दिवस मेजवानी दिली.


तेथील पडदे पांढर्‍या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्‍यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्‍या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते.


मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे, देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकतो; ही त्याची करणी नव्हे तर दुसर्‍या कोणाची?


पाहा, परमेश्वर तुला बलवान पुरुषाप्रमाणे झुगारून देणार आहे; तुला मगरमिठीत धरणार आहे.


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता दाखव आपले अंतर्ज्ञान!” आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan