Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 7:6
18 Iomraidhean Croise  

आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणार्‍या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले.


तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला दिली.


अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “असे करण्याचे धाडस करणारा कोण व तो कोठे आहे?”


त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा वैरी हामान ह्याचे घरदार एस्तेर राणीला दिले. मर्दखयही राजाकडे आला; कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजाला सांगितले होते.


दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले.


राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.


एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.


माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे.


जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan