एस्तेर 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
4 माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”
4 कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.”
4 कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती.”
वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरां-सारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पाहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांना सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसर्यांच्या हाती गेले आहेत.”
राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी.
त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.
पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.
त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात;
जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हांला जहाजांनी मिसर देशात परत नेईल; तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वत:ची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हांला विकत घेणार नाही.