Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग एस्तेर राणी म्हणाली, “महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 7:3
9 Iomraidhean Croise  

त्याचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकतो की इस्राएल घराण्याचे राजे दयाळू असतात; तर आमच्या कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्‍या बांधून आम्हांला इस्राएलाच्या राजाकडे जाऊ द्या; तो कदाचित आपला प्राण वाचवील.”


मग राजाने तिसर्‍यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्‍या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.


यहूदी लोकांचा विध्वंस करण्याविषयीची जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस.


महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब


तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.


ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.


सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.


तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan