Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 7:10
22 Iomraidhean Croise  

पण त्याने आचार्‍यांच्या नायकाला फाशी दिली. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले.


ह्यानंतर अहश्वेरोश राजाचा क्रोध शमला, तेव्हा त्याला वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता ह्याचे स्मरण झाले.


तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला.


तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.


मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले.


मग अहश्वरोश राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहूद्यास म्हणाला, “हामानाने यहूद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले.


त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली. शूशन येथून फर्मान निघाले व लोकांनी हामानाच्या दहा पुत्रांना फासावर लटकवले.


पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.


तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे.


तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही; रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील,


त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.


त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल.


तो त्यांची अनीती त्यांच्यावरच उलटवील; त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यांना नाहीसे करील; आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.


जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल.


नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो.


जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.


अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे.


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!”


मग त्याने मला हाक मारून म्हटले, “पाहा, उत्तर देशाकडे जाणार्‍यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे.”


शमशोन त्यांना म्हणाला, “तुमची वागणूक अशी असल्यामुळे तुमचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan