Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग तो पोशाख व घोडा महाराजांच्या कोणाएका मोठ्या सरदाराच्या हाती देऊन महाराज गौरव करू इच्छितात त्याला त्याने तो पोशाख लेववावा. त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्यापुढे ललकारावे की, ‘राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना ह्या प्रकारे होते.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:9
5 Iomraidhean Croise  

मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले.


राजा हामानास म्हणाला, “त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर, तू बोललास तसे करण्यात काहीएक अंतर होऊ नये.”


हामान आत आल्यावर राजाने त्याला विचारले, “एखाद्या मनुष्याचा मानसन्मान करण्याचे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसाची कशी काय संभावना करावी?” हामान आपल्या मनात म्हणाला, “माझ्याहून दुसर्‍या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार?”


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan