Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हामान आत आल्यावर राजाने त्याला विचारले, “एखाद्या मनुष्याचा मानसन्मान करण्याचे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसाची कशी काय संभावना करावी?” हामान आपल्या मनात म्हणाला, “माझ्याहून दुसर्‍या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हामान आत आला तेव्हा राजाने त्यास विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या मनुष्यासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, “माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:6
19 Iomraidhean Croise  

राजाने त्यांना विचारले की, “अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वश्ती राणीने मानली नाही तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे?”


आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.


हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”


राजसेवकांनी राजाला सांगितले, “हामान चौकात उभे आहेत.” राजा म्हणाला, “त्याला आत बोलवा.”


हामान राजाला म्हणाला, “एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास


मग तो पोशाख व घोडा महाराजांच्या कोणाएका मोठ्या सरदाराच्या हाती देऊन महाराज गौरव करू इच्छितात त्याला त्याने तो पोशाख लेववावा. त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्यापुढे ललकारावे की, ‘राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना ह्या प्रकारे होते.”’


माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.


कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;


गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.


पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


खडकाच्या कपारींत उच्च स्थानी वसणार्‍या, तू आपल्या मनात समजतोस की, “मला खाली जमिनीवर कोण पाडणार?” ह्या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे.


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.


ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan