Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा राजाने विचारले की, “ह्या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्याला सांगितले, “त्याच्या बाबतीत काहीएक करण्यात आले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?” “त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:3
12 Iomraidhean Croise  

तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.


दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले.


त्यात हा मजकूर होता : अहश्वेरोश राजाच्या द्वारपाळांपैकी दोन खोजे बिग्थान व तेरेश ह्यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली.


राजाने विचारले, “चौकात कोण आहे?” त्या वेळी, तयार केलेल्या फाशी देण्याच्या खांबावर मर्दखयास फाशी द्यावे अशी राजाकडे विनंती करण्यास हामान राजमंदिराच्या बाहेरल्या चौकात आला होता.


त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.


मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.”


तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे.


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan