Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग हामानाने आपली स्त्री जेरेश व आपले सर्व मित्र ह्यांना आपल्यावर आलेला प्रसंग विदित केला. तेव्हा त्याचे बुद्धिमान मित्र व त्याची बायको हे त्याला म्हणाले, “ह्या मर्दखयापुढे तुमचा अधःपात होऊ लागला आहे; तो जर यहूदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हायचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अध:पात होणार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्यास म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध:पात खचीतच होणार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:13
16 Iomraidhean Croise  

मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले.


फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”


सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.


संकट व क्लेश ही त्याला घाबरवतात; लढाईस सज्ज झालेल्या राजासारखी ती त्याला घेरतात;


“असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकल्या आहेत; तुम्ही सगळे भिकार सांत्वनकर्ते आहात.


“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”


सरळ मार्गाने चालणार्‍याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो.


हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली.


जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.”


तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”


तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan