Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर मर्दखय राजद्वारी परत आला, परंतु हामान घाईघाईने, आपले मस्तक अत्यंत शोकाने झाकून घरी परतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:12
14 Iomraidhean Croise  

दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.


आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.


मग इस्राएलाचा राजा उदास व खिन्न होऊन शोमरोनास आपल्या घरी गेला.


“मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.


तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’


मुख्य याजक अजर्‍या व दुसरे सर्व याजक ह्यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले; परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला.


कुमारी दुसर्‍यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.


हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”


मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले.


की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.


पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे, देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकतो; ही त्याची करणी नव्हे तर दुसर्‍या कोणाची?


मग शमुवेल सकाळपर्यंत निजून राहिला; सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. हा दृष्टान्त एलीला कळवण्याचे शमुवेलाला भय वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan