Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयाला सजवले आणि शहराच्या रस्त्यातून त्याला मिरवून त्याच्यापुढे ललकारले की, “राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची ह्या प्रकारे संभावना होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:11
9 Iomraidhean Croise  

दायरावेश राजाच्या ह्या फर्मानाप्रमाणे महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ, शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही ह्यांनी ताबडतोब केले.


राजा हामानास म्हणाला, “त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर, तू बोललास तसे करण्यात काहीएक अंतर होऊ नये.”


मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता.


जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो.


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan