Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 6:1
12 Iomraidhean Croise  

म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.


त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढवल्याची साद्यंत हकिकत मेदी व पारसी ह्यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय?


त्या दिवसांत मर्दखय राजद्वारी बसत असे; तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे दोन खोजे बिग्थान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते.


मर्दखयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस्तेर राणीला ती सांगितली, आणि एस्तेरने मर्दखयाच्या नावाने राजाला ती सांगितली.


चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली; तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिले आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले.


महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब


दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.


नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली.


नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली.


तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


Lean sinn:

Sanasan


Sanasan