Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मेजवानीवरून घरी परतल्यावर हामान खूपच आनंदात होता. परंतु राजवाड्याच्या दाराजवळ बसलेल्या मर्दखयास बघितले व आपल्यासमोर तो उठून उभा राहिला नाही, घाबरला नाही, हे पाहून हामान संतापाने भरून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 5:9
19 Iomraidhean Croise  

“मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.


तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’


कुमारी दुसर्‍यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.


राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे.


मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.


एवढे असूनही तो मर्दखय यहूदी राजद्वारी बसलेला माझ्या दृष्टीला पडत आहे तोवर हे सर्व व्यर्थ आहे.”


की दुर्जनांचा जयजयकार अल्पकालिक असतो; अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.


‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्‍यातल्या लोकांनी म्हटले नसेल,


अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,


सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन.


हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले.


अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.


त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan