Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्याला आपण हामानास घेऊन यावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 5:4
10 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “ते माझ्याकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याच्याकडे आणले व त्याने ते खाल्ले; मग त्याने त्याला द्राक्षारस आणून दिला तो, तो प्याला.


आणि सांगा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे.” याकोबाला वाटले की, पुढे भेट पाठवून त्याला शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील.


वश्ती राणीनेही राजा अहश्वेरोश ह्याच्या राजमंदिरात स्त्रियांना मेजवानी दिली.


हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.


राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”


राजा म्हणाला, “जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू.” मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले.


महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब


जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते; तो न्यायाने आपले व्यवसाय करील.


मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan