Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजाने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले तेव्हा त्याची तिच्यावर कृपादृष्टी झाली; आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकाला स्पर्श केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा त्याने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तिला बघून तो प्रसन्न झाला, तेव्हा त्याने आपला सोन्याचा राजदंड तिच्या दिशेने पुढे करून तिचे स्वागत केले, म्हणून एस्तेर जवळ गेली आणि तिने राजदंडाच्या टोकास स्पर्श केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 5:2
9 Iomraidhean Croise  

त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर.” (ह्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो.)


ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली.


“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.”


तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली.


मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan