एस्तेर 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा त्याची पत्नी जेरेश हिने आणि त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सुचविले, “पन्नास हात उंचीचा एक खांब तयार करून घ्या आणि सकाळीच मर्दखयाला त्या खांबावर देण्याची परवानगी राजाजवळ मागून घ्या. हे साध्य करून घेतल्यावर, राजाबरोबर खुशाल आनंदाने मेजवानीला जा.” या सूचनेने हामान प्रसन्न झाला आणि त्याने खांब तयार करून घेतला. Faic an caibideil |