Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 5:11
19 Iomraidhean Croise  

नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे.


त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले.


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.


कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.


हे तू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन; तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे.


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे!


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan