Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 “जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 “जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 4:16
29 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”


हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”


नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच; तर चला, आपण अरामी सेनेस जाऊन मिळू; त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू; त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू एवढेच.”


यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की,


मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.


राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


ह्या पत्राचा आशय असा होता की, पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहूदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


तेव्हा असे झाले की यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या मासी यरुशलेमेतले सर्व लोक व यहूदाच्या नगरांतून जे सर्व यरुशलेमेस आले होते त्यांनी परमेश्वरापुढे जाहीर उपवास नेमला.


आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे.


कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.


जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील.


पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.”


जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले;


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, “आज चौदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात; तुम्ही काही खाल्ले नाही.


तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.


त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.1 त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात.


कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्‍त सांडण्याचे पाप का करता?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan