Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 3:8
25 Iomraidhean Croise  

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली.


तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन;


राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी; राजभांडारात जमा करण्यासाठी मी दहा हजार किक्कार चांदी राजाच्या कारभार्‍यांच्या हाती देतो.”


हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले;


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


ह्याकरता असे म्हण, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी त्यांना राष्ट्रांत दूर घालवून देऊन देशोदेशी पांगवले आहे, तरी ज्या ज्या देशात ते गेले त्यांत मी त्यांना अल्पकाळ पवित्रस्थान होईन.’


तरी तुम्ही देशोदेशी परागंदा व्हाल तेव्हा राष्ट्रांमध्ये तुमच्यापैकी काही तलवारीपासून निभावून राहतील; असे अवशेष मी राखून ठेवीन.


ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला.


तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.”


हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला, आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला; त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.


ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?


हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.


तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”


तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील.


‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,


परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.


बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.


पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan