Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 3:5
13 Iomraidhean Croise  

खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वश्ती राणीने येण्याचे नाकारले; त्यावरून राजाला फार क्रोध येऊन तो संतप्त झाला.


राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे.


ते रोज त्याला असे बोलत तरी त्याने त्यांना जुमानले नाही, तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली; आपण यहूदी आहोत असे त्याने त्यांना सांगितले होते.


त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;


मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.


दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो.


मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो.


क्रोधिष्ट मनुष्याने आपला दंड भोगला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुन्हा करावे लागेल.


गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.


ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते.


हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan