Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आता राजाज्ञेप्रमाणे राजद्वारावरील सर्व अधिकारी हामानाला अतिशय आदराने गुडघे टेकवून मुजरा करू लागले. परंतु मर्दखयाने गुडघे टेकवून मुजरा करण्याचे नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 3:2
15 Iomraidhean Croise  

मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले.


कुमारी दुसर्‍यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.


त्या दिवसांत मर्दखय राजद्वारी बसत असे; तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे दोन खोजे बिग्थान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते.


शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता;


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?”


मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला.


त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;


अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,


आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”


आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल.”


राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला; पण दानीएल राजदरबारी असे.


म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वीतलावरून बुजवून टाक; विसरू नकोस.


ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan