एस्तेर 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली. Faic an caibideil |
तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीस दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, “मेदी व पारसी ह्यांच्या न पालटणार्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरवले आहे.”