एस्तेर 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
8 राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले.
8 जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता.
8 जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले.
मर्दखयाचा चुलता अबीहाईल ह्याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची राजाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे ह्याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने-ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली.
राजाने आपल्या राज्याच्या सर्व प्रांतांत अंमलदार नेमावेत, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन राजवाड्यातील अंतःपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्यात आणि त्यांच्या शुद्धतेसाठी असलेल्या वस्तू त्यांना द्याव्यात.