Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली; तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिले आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा ते दोन अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांना सुळावर चढविण्यात आले. हे सर्व वृत्त राजाच्या समक्षतेत कारकिर्दीच्या इतिहासग्रंथात नोंदण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 2:23
11 Iomraidhean Croise  

फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”


पण त्याने आचार्‍यांच्या नायकाला फाशी दिली. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले.


आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते.


त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढवल्याची साद्यंत हकिकत मेदी व पारसी ह्यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय?


तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, “पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी द्यावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा.” ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करवून घेतला.


त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला


तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.


आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan