Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली, त्याने तिला इतर सर्व कुमारिकांपेक्षा जास्त पसंत केले, तो तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्या मस्तकांवर राणीचा राजमुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी एस्तेरला राणी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 2:17
10 Iomraidhean Croise  

वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती.


ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली.


तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्‍या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”


महाराज धारण करतात तो पोशाख आणवावा, त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवतात तो आणवावा;


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


वनांतील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीच वृक्षास उंच केले आहे, आणि हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे; मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.”


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan