Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 एस्तेरने आपले राष्ट्रीयत्व व कौटुंबिक माहिती कोणालाही सांगितली नाही, कारण मर्दखयाने तिला ते सांगू नये असे बजावले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 2:10
9 Iomraidhean Croise  

एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्‍या घालत असे.


अद्याप एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते; मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी, त्याचप्रमाणे तिने ह्या वेळीही त्याची आज्ञा मानली.


त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते; तिला आईबाप नव्हते; ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते.


हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही.


माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा ह्या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे ह्या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैर्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.


तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan