एस्तेर 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मर्दखय यहूदी ह्याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता; यहूदी लोकांमध्ये तो फार थोर होता; त्याच्या बांधवसमुदायात त्याची मोठी मान्यता असे; तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल ह्याकडे त्याचे लक्ष असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहूदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहूदी बांधव त्यास फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 खुद्द अहश्वेरोश राजाच्या खालोखाल मर्दखयचे पद होते. अर्थात्, तो यहूदी लोकांमध्ये अतिशय थोर होता आणि त्याचे सर्व देशबांधव त्याचा फार आदर करीत, कारण तो आपल्या लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खूप झटत असे व त्यांच्या हितासाठी रदबदली करीत असे. Faic an caibideil |