Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढवल्याची साद्यंत हकिकत मेदी व पारसी ह्यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये, त्यांची आणि मर्दखयाचे महत्व, राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मर्दखय यहूदीस उच्चपद प्रदान केले, मर्दखयाची थोरवी, त्याची महान कृत्ये आणि त्याचप्रमाणे त्याला राजाकडून प्राप्त झालेले सन्मान यांची साद्यंत हकिकत मेदिया व पर्शियाच्या राजाच्या इतिहासग्रंथात लिहिलेली नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 10:2
10 Iomraidhean Croise  

शलमोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण ह्यांचे वर्णन शलमोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय?


यराबामाने इतर कोणत्या गोष्टी केल्या, युद्ध कसे केले व राज्य कसे चालवले ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे.


अहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते, त्याने बांधलेले हस्तिदंती गृह, त्याने वसवलेली सर्व नगरे ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?


चौकशी झाल्यावर ती बातमी खरी ठरली; तेव्हा त्या दोघांना झाडावर फाशी दिले आणि हे वृत्त राजासमोर इतिहासाच्या ग्रंथात लिहून ठेवण्यात आले.


त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले.


मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला.


तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.


मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan