एस्तेर 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटांवर खंडणी बसवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहश्वेरोश राजाने आपल्या संपूर्ण साम्राज्याच्या मुख्य भूमीवर व समुद्रकिनाऱ्यावरील बेटांवर कर लावला. Faic an caibideil |
त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.