Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या मेजवानीत राजाला पिण्यास योग्य असा द्राक्षारस तर्‍हेतर्‍हेच्या सुवर्णपात्रांत घालून राजाच्या औदार्यानुसार लोकांना विपुल पिण्यास देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 सोन्याच्या पेल्यांतून पेयपदार्थ वाढले जात होते. प्रत्येक पेला अव्दितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षरस पुष्कळच होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 1:7
6 Iomraidhean Croise  

शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.


शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोनी वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नसे.


हे पिणे नियमानुसार असे; कोणी कोणाला आग्रह करीत नसे; राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभार्‍यांना आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी.


मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.


आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan