एस्तेर 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेथील पडदे पांढर्या, हिरव्या, व निळ्या रंगाचे होते; हे पडदे तलम सणाच्या व जांभळ्या रंगाच्या दोर्यांनी चांदीच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी खांबांना लावले होते; तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढर्या, पिवळ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर ठेवले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बागेच्या अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळया दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते. तेथील मंचक सोन्यारुप्याचे असून तांबड्या, पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सजावटीचे पडदे पांढर्या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती. Faic an caibideil |