Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 1:4
25 Iomraidhean Croise  

परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.


आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले;


एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहानथोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात सात दिवस मेजवानी दिली.


तू आपणास महिमा व प्रताप ह्यांनी भूषित कर; तेज व ऐश्वर्य धारण कर.


तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन.


तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस.


हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर.


परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.


तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही.


तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढवलेस; ह्या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली; माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली; माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले; मी आपल्या राज्यात स्थापित झालो; व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली.


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले,


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी,


ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.


“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan