एस्तेर 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 राजाची मर्जी असल्याने त्याने एक राजकीय फर्मान फिरवावे आणि काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी व मेदय ह्यांच्या कायद्यांत असे लिहून ठेवावे की वश्तीने राजा अहश्वेरोश ह्याच्यासमोर पुन्हा येऊ नये आणि तिच्याहून कोणी चांगली असेल तिला पट्टराणीचे पद मिळावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जर राजाची मर्जी असल्यास, राजाने एक राजकीय फर्मान काढावे आणि त्यामध्ये काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि माद्य यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की, वश्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोशच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी. Faic an caibideil |
ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.