Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा आली तरी वश्ती राणीने येण्याचे नाकारले; त्यावरून राजाला फार क्रोध येऊन तो संतप्त झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वश्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला; त्याचा क्रोधाग्नी भडकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 1:12
19 Iomraidhean Croise  

तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती.


मग राजाने काळ जाणणार्‍या पंडितांना विचारले; (तो राजा सर्व न्यायशास्त्री व कायदेतज्ज्ञ ह्यांचा असा सल्ला घेत असे;


तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.


हे देवा, तू आम्हांला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो?


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?


मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातांतल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.


अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो.


हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली.


हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले.


हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा.


तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे.


परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.


तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan