Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




एस्तेर 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले; त्याचे साम्राज्य हिंदुस्तानापासून कूशापर्यंत होते; ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतांवर होता तोच हा अहश्वेरोश.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत (अहश्वेरोश राजा भारत देशापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस प्रांतांवर राज्य करत होता),

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 भारतापासून कूशपर्यंत पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश च्या कारकिर्दीत हे घडले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




एस्तेर 1:1
10 Iomraidhean Croise  

अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली.


अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटांवर खंडणी बसवली.


राजाने आपल्या राज्याच्या सर्व प्रांतांत अंमलदार नेमावेत, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन राजवाड्यातील अंतःपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्यात आणि त्यांच्या शुद्धतेसाठी असलेल्या वस्तू त्यांना द्याव्यात.


त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्‍या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.


त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती;


अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्‍या पंखांच्या देशा!


मग कूशाचा राजा तिर्‍हाका आपणांशी लढायला निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले. हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,


आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. पाहा, पारस देशात तीन राजे उत्पन्न होतील; चौथा त्या सर्वांहून धनवान होईल; तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या1 राज्याविरुद्ध उठवील.


दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले;


मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खास्द्यांच्या देशावर राजा होता त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी


Lean sinn:

Sanasan


Sanasan