इफिसकरांस 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
9 धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा; व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
9 मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या. तुमचा व त्यांचा मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही, या सत्याची आठवण ठेवा.
9 आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.
वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरां-सारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पाहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांना सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसर्यांच्या हाती गेले आहेत.”
जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?
एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.
मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.
आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”
मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.
कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे.
पाहा, ज्या कामकर्यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.
शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”