Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 6:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझे कसे काय चालले आहे हे तुम्हांलाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हांला सर्वकाही कळवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 माझे कसे काय चालले आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून आपला प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक तुखिक तुम्हांला सर्व काही कळवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 6:21
11 Iomraidhean Croise  

पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले.


ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.


बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे;


एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे.


मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवल्यावर होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले आहे.


त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे; मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा.


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan