Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 6:13
15 Iomraidhean Croise  

आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.


अहो तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकता आणि बलात्काराचे आसन जवळ आणता.


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.


वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.


पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो.


ख्रिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हांला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहावे.


म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.


म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे;


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan