Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्रसामग्री धारण करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 6:11
30 Iomraidhean Croise  

ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.


कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.


सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हांला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही;


आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही :


Lean sinn:

Sanasan


Sanasan