Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 मुलांनो, प्रभूमध्ये तुमच्या आईबापांच्या आज्ञेत राहा; कारण हे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 6:1
33 Iomraidhean Croise  

आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन-अरामास गेला आहे.


मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.”


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


इस्राएलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले;


तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या;


अद्याप एस्तेरने आपले गणगोत सांगितले नव्हते; मर्दखयाने तिला तशीच आज्ञा केली होती. एस्तेरचे मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानी, त्याचप्रमाणे तिने ह्या वेळीही त्याची आज्ञा मानली.


तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्‍चित्त मला मिळाले नाही;


ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.


हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.


परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.


माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.


बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.


जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.


माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याने आपल्या वंशजांना द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे; त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही; आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानली; पण मी मोठ्या निकडीने तुम्हांला सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही.


तेव्हा यिर्मया रेखाबवंशजांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्याचा निर्बंध मानला व त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या व त्याने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले;


आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला जो निर्बंध घालून दिला तो सर्व आजवर आम्ही पाळत आलो आहोत; आमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांसह आम्ही कधी द्राक्षारस प्यालो नाही;


जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या.


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


अशासाठी की, तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे; कारण ती स्वत: पुष्कळ जणांस व मलाही साहाय्य करणारी अशी झाली आहे.


तरीपण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला,


कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.


प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन;


ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”


दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्‍याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan