Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:8
43 Iomraidhean Croise  

तू कराराकडे लक्ष दे; कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची वसतिस्थाने झाली आहेत.


याकोबाच्या घराण्या, चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”


तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


ह्यास्तव पश्‍चात्तापास योग्य असे फळ द्या;


अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”


‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”


अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.


जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.


जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश,


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


तुम्ही विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?


आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.


त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.


आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी.


त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan