Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:14
23 Iomraidhean Croise  

तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.


कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”


कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’


आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता;


ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे);


म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.


ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.


ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.


आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan