Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:26
22 Iomraidhean Croise  

राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.


त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)


तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की, आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोपुढून निघून गेला.


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.


विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.


उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.


मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.


“अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नकोस. ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे करील आणि तुला पाप लागेल.


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.


तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेजावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही; आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan