त्या दिवसांत यहूदात काही लोक शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादत; त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ ह्यांचे बोजे शब्बाथ दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली त्याच दिवशी त्यांची मी कानउघाडणी केली.
“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.
देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.
मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच [ख्रिस्ताच्या ठायी] कायम केलेला करार चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही.
कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.
सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,
देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
भ्रमात असणार्या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.