Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 2:12
51 Iomraidhean Croise  

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते;


पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”


उपरे अथवा मोलकरी ह्यांपैकी कोणी ते खाऊ नये.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील.


हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास?


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


निरर्थक दृष्टान्त पाहणार्‍या व खोटे शकुन सांगणार्‍या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल; माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्राएल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हायची नाही; इस्राएल देशात त्यांचे जाणे होणार नाही; तेव्हा तुम्हांला समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.


आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.


असे करा की तुम्ही आपल्या वतनासाठी आणि तुमच्यात वस्ती करणारे व तुमच्यात राहून संतती झालेले परराष्ट्रीय लोक ह्यांच्या वतनासाठी हा देश चिठ्ठ्या टाकून वाटून घ्या. हे पराष्ट्रीय लोक इस्राएल वंशजांमध्ये जन्मलेले आहेत असे धरून चाला; त्यांना तुमच्याबरोबर इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटा मिळावा.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


जितकी पवित्र समर्पणे इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व मुलींचा निरंतरचा हक्क आहे; हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अति पवित्र आणि दृढ करार1 केला आहे.”


अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’,


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.


तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.


कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”


ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले; कारण इस्राएलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.”


तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.


म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.


तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;


तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात;


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,


ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.


ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले.


बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.


आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.


तुम्ही त्याच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात; त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.


तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या;


जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan