Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 2:11
29 Iomraidhean Croise  

ज्या तुमच्या मार्गांनी व ज्या तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणांस विटाळले, त्यांचे स्मरण तुम्हांला होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट मानाल.


तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल.


ते त्याला म्हणाले, ‘आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. जे योग्य ते तुम्हांला मिळेल.’


आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,


तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?


आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील.


तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हांला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.


आम्ही जन्मतः यहूदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयांतले नाही;


जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.


त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.


तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.


तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,


त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव1 झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली.


जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;


ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan