Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:3
39 Iomraidhean Croise  

ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.


तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”


मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले.


याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.


हिज्कीया व सरदार ह्यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्राएल ह्यांचा धन्यवाद करू लागले.


मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.


आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल; परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांना पाहणारे कबूल करतील.”


हे दिवस संपल्यावर मी नबुखद्नेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले; माझी बुद्धी मला परत आली; मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणार्‍या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गाइला; कारण त्याचे प्रभुत्व सर्वकाळचे आहे, आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.


तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांत घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले :


त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे.


ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.


येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”


तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो.


आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.


म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणार्‍या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो.2


ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;


त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले;


आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले;


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.


आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.


“पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.


ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते; प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan