Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सर्वदा तुझी वस्त्रे शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्यास तेलाचा अभिषेक असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 9:8
15 Iomraidhean Croise  

तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन;


शौलाचा नातू मफीबोशेथ हा राजाच्या भेटीसाठी आला; राजा निघून गेला होता तेव्हापासून तर तो सुखरूप घरी परत येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते; आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती.


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.


तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.


तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.


तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू;


तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले.


(“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”)


स्वर्गातील सैन्ये पांढर्‍या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


तर तू नाहणमाखण कर. चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan